नवी दिल्ली | जैन मुनी तरुण सागर यांचे शनिवारी दीर्घ आजाराने नवी दिल्ली येथे निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून तरुण सागर यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे देशभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना देखील सुरू होत्या. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे मुनी अशी तरुण सागर यांची ओळख समाजामध्ये वेगळी ओळख होती.
पूर्व दिल्ली स्थित कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री 3 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. अतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या अफाट आहे. त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तरुण सागर यांच्यावर आज दुपारी तीनच्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Jain Muni Tarun Sagar passed away this morning in Delhi. He was 51 years old. pic.twitter.com/xLn14g569u
— ANI (@ANI) September 1, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.