HW Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | भारत-पाकिस्तान सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाहीत. जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (२९ मार्च) पहाटेपासून भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास यश आले आहे. यावेळी मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. या चकमकीदरम्यान ४ जवान जखमी झाले आहेत. या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने या परिसराला घेराव घालण्यात आला असून सध्या शोधमोहीम सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये देखील गुरुवारी (२८ मार्च) सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले होते. शोपियान जिल्ह्यातील केल्लर येथे गुरुवारी (२८ मार्च) पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती. सुरक्षा दलाला केल्लर येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कर, भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्यांना ठार केले.

Related posts

अंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती

News Desk

#PulwamaAttack : सीसीआयकडून पुलवामा हल्ल्याचा ‘असा’ निषेध

News Desk

अमृतसर रेल्वे अपघातासाठी नागरिकच जबाबदार, सीसीआरएसचा अहवाल

News Desk