HW News Marathi
देश / विदेश

जेटचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांना देशाबाहेर जाताना अडविले

मुंबई | जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांना काल (२५ मे) मुंबई विमानतळावरील इमीग्रेशन अधिकार्‍यांनी रोखले. नरेश गोयल हे पत्नी अनीता यांच्यासह अमिरातच्या विमानातून लंडनला निघाले होते. परंतु गोयल त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस बजावण्यात आलेली असल्याने त्यांचा परदेशात निघून जाण्याचा प्रयत्न यशस्वी होवू शकला नाही. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन दिले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या संघटनेने त्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली होती.

गोयल दाम्पत्य काल दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी अमिरात कंपनीच्या इके ५०७ विमानातून लंडनला उड्डाण करणार होते. परंतु त्यांचा हेतू सफल होवू शकला नाही. अनिता गोयल यांच्या नावाने असलेल्या बॅग्ज विमानातून बाहेर काढण्यात आल्या. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजची सेवा १७ एप्रिलपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे.

जेट कंपनीने केलेले आर्थिक व्यवहार सध्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासह आयकर खात्यातर्फे तपासले जात आहेत. याशिवाय सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील जेट एअरवेजचे इतर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी कसे व्यवहार आहेत. याची देखील चौकशी सुरू आहे. जेट एअरवेजच्या एकूणच कारभारात गोयल यांची महत्वाची भूमिका राहिल्याने ही कारवाई करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमान अपघातात १०५ प्रवाशांचा मृत्यू

News Desk

“निवडणूका संपल्या की दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?”,जयंत पाटलांचा संतप्त सवाल

News Desk

तीन राज्यात आता काँगेसची सत्ता

News Desk