इस्लामाबाद | दहशतवादाविरोधात भारताचा दबावाला मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये बेड्या ठोकल्या आहे. हाफिज सईदला अटक केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
Jamatud Dawa's Hafiz Saeed arrested and sent to judicial custody: Pakistan media (file pic) pic.twitter.com/1Txu9BlvoK
— ANI (@ANI) July 17, 2019
गुजरनवालाहून लाहोरमध्ये जाताना हाफिज सईदला अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली आहे. पाकिस्तानात दहशतवादाविरोधात काम करणारी सरकारी संस्था काऊंटर टेरोरिझम डिपार्टमेंट अर्थात सीटीडीने हाफिज सईदला बेड्या ठोकल्या. पाकिस्तानने याआधी फीज सईद याच्या जमात- उद- दावा आणि त्याची चॅरिटी असलेल्या फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवर बंदी घातली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.