HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात ३ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर या चकमकीतदरम्यान एक जवान शहीद झाला असून तर एका स्थानिक नागरिकाचाही यात मृत्यू झाला आहे. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकर याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश मिळाले आहे. राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूरचेही नाव होते. सुरक्षा जवानांनी त्याचा खात्मा करून मोठे यश मिळवले आहे.

परंतु अद्यापही दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्च ऑपरेशन राबवले जाते आहे. अनेक तास चाललेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांना हिजबुलचा ठोकर याचा खात्मा करण्यात यश आले आहे. यादरम्यान एक जवानही जखमी झाला आहे. सध्या तरी सुरक्षा जवानांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांशी चकमक सुरू असताना सुरक्षा जवानांची स्थानिक लोकांशी वाद झाला, त्यादरम्यान अनेक जण जखमी झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ED कडून अटक

News Desk

भारतीय सैन्य-दहशतवाद्यांमधील चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

कांदा निर्यातबंदीने देशाच्या प्रतिमेला धक्का बसेल- शरद पवार  

News Desk