नवी दिल्ली | देशाचे स्वर्ग समजले जाणारे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे आजपासून (३१ ऑक्टोबर) केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत. केंद्र सरकारने गुजारातमधील सनदी अधिकारी जी.सी. मुरमू यांची जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आली आहे. तर राधाकृष्ण माथूर यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
Under the Jammu and Kashmir Reorganisation Act, 2019, the state of Jammu and Kashmir has been divided into two Union Territories — Jammu and Kashmir, and Ladakh, from midnight. pic.twitter.com/XBDGhhmIDA
— ANI (@ANI) October 31, 2019
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर ३१ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखही दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्ये अस्तित्वात आली आहे. या दोन्ही राज्यांत संसदेने तयार केलेले अनेक कायदे लागू होणार असून जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असणार आहे. दिल्लीप्रमाणेच विधानसभा, नायब राज्यपाल यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मिरचा कारभार चालणार आहे. तर लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा असणार नाही. या प्रदेशाचा कारभार केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नायब राज्यपालांच्या माध्यमातून पाहिला जाणार आहे. आता देशात २८ राज्ये तर ९ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.