HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमधील हंदवाडामध्ये भारतीय लष्कराकडून १ दशतवाद्याला कंठस्नान

श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. आज (७ मार्च) पहाटेपासून हंदवाडामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यास भारतीय लष्कराला यश आले आहे. हंदवाडा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. यानंतर लष्कराने संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव कार्लगुंडा आणि हांडवाडामध्ये इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (५ मार्च) पहाटेपासून चकमक सुरू झाली होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तसेच याआधी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चकमक सुरू होती.

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये सोमवारी (४ मार्च) पहाटे ३ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबारी होती. या गोळीबारीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. ही गोळीबारी ६.३० वाजता थांबली. याआधी जम्मू-काश्मीरच्या हंडवाडा परिसरात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेप, NIA च्या विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

Aprna

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनंतर पाकिस्तानची तातडीची बैठक

News Desk

छिंदमचे वकील पत्र स्वीकारणाल्याच्या अफवामुळे वकिलाला त्रास

swarit