नवी दिल्ली | काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये आज (१६ फेब्रुवारी) आयईडीचा भीषण स्फोट झाला आहे. दहशतवाद्यांकडून भारतीय लष्करासाठी हे आयईडी स्फोट पेरण्यात आले होते. या आयईडीचा स्फोटात एक जवान शहीद झाला असून, एक जवान जखमी आहे. तो लष्कराचा अधिकारी आयईडी बॉम्ब निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत असतानाच आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात एका जवानाला वीरमरण आले.
The Major-rank army officer was killed while defusing an Improvised Explosive Device (IED) which had been planted by terrorists. The officer is from the Corps of Engineers. The IED was planted 1.5 kms inside the Line of Control in the Naushera sector, Rajouri district, in J&K https://t.co/ZyWFS9RbWR
— ANI (@ANI) February 16, 2019
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आतील १.५ किलोमीटर अंतरावर दहशतवाद्यांनी हा आयईडीचा बॉम्ब भारतीय लष्करासाठी पेरून ठेवला होता. त्यानंतर लष्करातील एका अभियंत्या जवानाने तो निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यादरम्यानच बॉम्बचा स्फोट झाला आणि तो जवान शहीद झाला. संपूर्ण परिसराला लष्कराने घेरले असून भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.