श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तब्बल १२ दिवसांनानंतर आज (१८ ऑगस्ट) २जी इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून फोन देखील सुरू झाले आहे. तर जम्मू-काश्मीरमधील शाळा-कॉलेज सोमवारपासून (१९ ऑगस्ट) सुरू होणार आहेत. अशी माहिती जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी व्ही सुब्रमण्यम यांनी दिली. जम्मू काश्मीरच्या जम्मू, सम्बा, कथुआ आणि उधमपूर येथील २जी इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यात परिस्थिती सर्वसामान्य असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
Latest visuals from UDHAMPUR; 2G mobile internet services have been restored in the city today. #JammuAndKashmir pic.twitter.com/t3N49pNpYg
— ANI (@ANI) August 17, 2019
जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर परिस्थिती बिगडू नये. यासाठी ५ ऑगस्ट रोजी अनेक सचार बंदी घालण्यात आल्या होती. यानंतर कोणतीही मोठी प्रकराचा हिंसाचाराच्या घटना समोर आलेली नाही, त्यामुळे येथील २जी इंटरनेट आणि फोन सुरू केल्याची माहिती सुब्रमण्यम यांनी काल (१६ ऑगस्ट) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. यावेळी गेल्या १२ दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात हिंसाचार आणि जीवितहानीची एकही घटना घडली नसल्याचे सांगितले. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जनजीवन सुरळीत झाले असून केवळ पाच जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध असल्याचे ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.