HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधीना भेटण्यास जिन्गेश मेवाणींचा नकार

– भाजप विरोधी आघाडीला मात्र पाठींबा

नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यात भाजप विरोधीगटांना एक करण्याचा जोरदार प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. या पार्श्वभूमिवर आज गुजरातमधील राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते जिग्नेश मेवाणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेणार होते. मात्र मेवाणी यांनी राहुल गांधींना भेटण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत पक्षाची भूमिका स्पष्ट होत नाही, तोवर भेटण्यात काही अर्थ नाही असे गुजरात काँग्रेसचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान काँग्रेसमध्ये सहभागी होणार नाही, पण भाजपच्या विरोधात तयार होणाऱ्या आघाडीला त्यांचा पाठिंबा असेल असे वक्तव्य जिग्नेश यांनी केले होते.

सध्याची स्थिती पहाता भाजपला ही निवडणूक जिंकले फार कठीण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या सर्व गोष्टी पहाता दलितांना पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने वळवण्यासाठी जिग्नेश आणि राहुल यांच्या भेटी घडवली जाणार होती. त्यात पुढील रणनिती आखली जाणार होती. राज्यात एकूण मतांपैकी जवळपास 8 टक्के मते दलितांची आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हेलिकॉप्टरचा दरवाजा तुटल्याने कोचीमध्ये २ नौसैनिकांचा मृत्यू

News Desk

“…सरकारला काळे कायदे रद्द करावे लागतील”, राहुल गांधींचं केंद्राला आव्हान!

News Desk

सीआरपीएफ’च्या पथकावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

News Desk