HW News Marathi
देश / विदेश

जपानचे शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

अहमदाबाद- जपानचे पंतप्रधान शिंजो अबे बुधवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या भेटीत ते गुजरातमध्ये गुंतवणूकीचे पंधरा महत्वपूर्ण करार करणार आहेत. भारत दौ-यावर आलेले अबे आणि मोदी यांचा आज अहमदाबादमध्ये रोड शो होणार आहे. विमानतळ ते टॅक्स ऑफीस या आठ किलोमीटरच्या मार्गावरील रोड शो मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. आठ किलोमीटरच्या रोड शो च्या संपूर्ण मार्गामध्ये साबरमती रिव्हर फ्रंटचा समावेश आहे. एकूण 28 छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. जिथे 28राज्यातील कलाकार आपल्या पारंपारिक वेशभूषेत नृत्यकला सादर करतील. अबे साबरमती गांधी आश्रमात जातील तेव्हा मोदी स्वत: त्यांच्यासोबत असतील. 1917 ते 1930 या काळात महात्मा गांधींनी साबरमती आश्रमात वास्तव्य केले होते. मोदी आणि शिंजो अबे 16 व्या शतकातील सिदी सय्यद मशिदीला भेट देतील. विशिष्ट प्रकारच्या दगडी बांधकामामुळे ही मशिद लक्ष वेधून घेते. गुरुवारी दोन्ही नेते भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी करतील. अहमदाबाद-मुंबई मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. दहा डब्ब्यांच्या या बुलेट ट्रेनमध्ये 750 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल. या ट्रेनमुळे दोन शहरांमधला सात तासांचा प्रवास तीन तासावर येणार आहे. पुढे या ट्रेनला 16 डब्बे असतील. त्यामधून एकाचवेळी 1200जणांना प्रवास करता येईल. बुलेट ट्रेनच्या या एकूण प्रकल्पासाठी 1.10 लाख कोटींचा खर्च येणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जनतेच्या हितासाठी पंतप्रधानांचे पाय धरायलाही तयार, सूडाचे राजकारण बंद करा!” – ममता बॅनर्जी

News Desk

अयोध्येचा प्रश्न कश्मीरसारखा बनू नये !

News Desk

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात कोरोनाचा हाहाकार

swarit