HW Marathi
देश / विदेश

नालासोपारा येथे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबई | नालासोपारा येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जेट एअरवेजच्या एका कर्मचाऱ्याने नालासोपारा येथील जेट एअरवेजच्या कर्मचारी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या मृत व्यक्तीचे नाव शैलेंद्र कुमार सिंह (५३) असे आहे. ते आत्महत्येसाठी इमारतीवर चढले होते. सोसायटीतील अन्य लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर जवळपास पुढचा एक तास पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्यांनाआत्महत्येपासून परावृत्त करण्याचे, वाचविण्याचे प्रयत्न करत होते. मात्र, तरीही त्यांनी इमारतीच्या बाजूला असलेल्या नाल्यात उडी मारली.

शैलेंद्र कुमार सिंह हे जेट एअरवेजमध्ये वरिष्ठ टेक्निशियन म्हणून काम करीत होते. ते आजारपणामुळे सुट्टीवर होते. गेले अनेक दिवस ते कर्करोगाने ग्रस्त असल्याची देखील माहिती मिळत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाने त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे, वाचविण्याचे प्रयत्न करून देखील या कर्मचाऱ्याने इमारतीच्या बाजूला असलेल्या नाल्यात उडी मारली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Related posts

#9pm9minute : पंतप्रधानांच्या आवाहनानुसार ‘कोरोना’चा अंधकार दूर करण्यासाठी देशवासियांनी लावले दिवे

News Desk

एससी-एसटी कायद्यातील दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

News Desk

भाजपच्या महिला खासदाराची पोलीस अधिकाऱ्याला चामडी सोलून काढण्याची धमकी

News Desk