HW News Marathi
देश / विदेश

जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषसह १९ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात जखमी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह १९ जणांवर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. घोष यांनी ४ जानेवारीला विद्यापीठातील सर्व्हर रुमची तोडफोड आणि सुरभा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा आरोप गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. जेएनयूमध्ये रविवारी (५ जानेवारी) झालेल्या हल्ल्यात आयशी घोषवर प्राणघातक हल्ला झाला होता. या देशभरात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि सामन्या नागरिकांनी सहभागी या हल्ल्याच्या निषधार्थ नोदविला.

जेएनयूत रविवारी काहीजणांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर अनेकांनी टीका केली होती. त्याआधी फी वाढ विरोधी आंदोलन जेएनयू विद्यार्थी संघटनेने पुकारले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून सबमिशन्स, परिक्षांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर चार जानेवारी विद्यापीठाच्या सर्व्हर रुमची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड जेएनयू विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप होता. पाच जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने ह्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. अखेर आज पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोषसह १९ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

दुचकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केले गुजरातच्या बसवर हल्ला

News Desk

EVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन हॅकरचा धक्कादायक खुलासा

News Desk