HW Marathi
देश / विदेश राजकारण

जे.पी.नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

JP Nadda

नवी दिल्ली | भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीची चर्चा सुरू झाली होती. मात्र,  भाजपमध्ये सर्वसहमतीनं राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची परंपरा आहे.  जे.पी.नड्डा यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी राधामोहन सिंग यांनी त्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा केली आहे.  केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात जूनमध्येच पत्र लिहिलं होतं. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात यावी, अशी विनंतीही या पत्रातून केली होती.

विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेले जे.पी.नड्डा हे आरएसएसच्या जवळचे मानले जातात. मूळचे हिमाचल प्रदेशातील असलेल्या नड्डा यांच्याकडे संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने सपा आणि बसपाच्या आघाडीच्या आव्हाहनाला परतवून लावत ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१९च्या जुलै महिन्यात नड्डा यांना भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. भाजपचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या संसदीय बोर्डात ते सदस्य देखील होते.

Related posts

देशभरात मोदींची त्सुनामी, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला अभूतपूर्व विजय मिळेल !

News Desk

#MaharashtraElections2019 | बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप, संदीप क्षीरसागर आक्रमक

News Desk

‘त्या’ नेत्याचे आडनाव ठाकरे नसते तर…!

News Desk