HW Marathi
देश / विदेश राजकारण

न्यायाधीश एस. मुरलीधर काँग्रेसचे निकटवर्तीय असलेली ‘ती’ व्हायरल पोस्ट खोटी

नवी दिल्ली | दिल्ली हिंसाचार प्रकरणात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी  दिल्ली पोलिसांना फटकारे होते. या पार्श्वभूमीवर एस. मुरलीधर यांची रातोरात बदली करण्यात आली. यावर मुरलीधर यांच्या बदलीनंतर उत्तर प्रदेशाचा महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला होता. सध्या मुरलीधर यांच्यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये म्हटले की, मुरलीधर हे काँग्रेसचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले आहे. यामुळे दिल्ली हिंसाचारवरील सुनावणीदरम्यान मुरलीधर यांनी भाजपच्या नेत्यांना सुनावले.

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये दोन फोटोंचे कोलाज करण्यात आले आहे. यात एका फोटोमध्ये मुरलीधर तर दुसऱ्या फोटमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रॉ यांच्यासोबत मुरलीधर असल्याचा या पोस्टमध्ये दावा केला. या पोस्टमध्ये बोले जात आहे की, मुरलीधर हे काँग्रेस न्यायधीश होण्यापुर्वी १० साली काँग्रेस संसद मनीष तिवाही यांचे सहकार्य होते.

दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून २६ फेब्रुवारी रोजी मुरलीधर यांनी  सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले होते. सुनावणी वेळी मुरलीधरन यांनी “भाजपचे नेता कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे दिल्लीत हिंसाचार उसळला, असे याचिकेत म्हटले. यावेळी मुरलीधर म्हणाले की, “कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा.”

‘त्या ‘व्हायरल पोस्टचे फॅक्ट चेक 

मुरलीधरन यांचे व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि व्हिडिओचे फॅक्टचेक केल्यानंतर पोस्टचे खरे सत्य समोर आले की, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती मुरलीधरन असल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये केला आहे. फॅक्टचेक केल्यानंतर माहिती समोर आले की, या फोटोत मुरलीधर सारखा दिसणारी व्यक्ती काँग्रेसचे कायदेशीर सल्लगार आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील के.सी. कौशिक आहेत. आणि मुरलीधर न्यायाशीध होण्यापुर्वी काँग्रेसचे संसद मनीष तिवारी यांचे सहायक होते. ही बातमी खोटी असल्याचेही समोरआले आहे.

 

 

Related posts

केरळमध्ये साथीच्या रोगांमुळे नागरिक त्रस्त

Gauri Tilekar

#Election2019 : जाणून घ्या…चंद्रपूर मतदारसंघाबाबत

News Desk

अखेर छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश

rasika shinde