HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : ४० जवान शहीद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांनी केला निषेध

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. भारतातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जाते. या हल्लानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायला हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. देशातील शहीद जवानांना दिग्गज नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातू हल्लाचा निषेध व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

“दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी या हल्लाचा निषेध व्यक्त करत आहेत, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शूर शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलमावा हल्लाचा निषेध व्यक्त केला आहे.

काश्मीरचे राज्यापाल यांनी भारतीय लष्करावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी निषेध व्यक्त केला आहे. या हल्लाच्या निषेधार्थ सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून दहशतवाद्यांना चांगला धडा शिकविला पाहिजल, असे मुफ्ती यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून काश्मीरमधील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. सीआरपीएफ जवानांवर झालेल्या या दुःखद हल्ल्यामुळे मला फार वाईट वाटले आहे. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमी जवान लवकरच बरे व्हावेत, अशी प्रर्थना मी करतो.

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या एका आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे काही जवान शहीद झाले आहेत तर अनेक जखमी आहेत. जे जखमी झाले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि जे शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सामील आहे. याबरोबरच २००४ – २००५ मध्ये जैशने असाच हल्ला केल्याची आठवण होत असून या हल्ल्याती जबाबदारी जैशने घेतल्याचे ट्वीटवरून सांगितले आहे.

कॉंग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी लखनऊमध्ये घतलेल्या पत्रकार परिषद रद्द करत आली. प्रियांका यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला ही देशासाठी दुर्दैवी घटना असून या धक्कादायक घटनेनंतर सध्या राजकारणावर चर्चा करणे मला उचित वाटत नसल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

20 वर्षांनंतर चीनला प्रथमच वित्तीय तूट

News Desk

#NirbhayaCase : आरोपी पवन गुप्ताच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

swarit

भारतात मोमो चॅलेंजचा दुसरा बळी

Gauri Tilekar