HW News Marathi
क्राइम

काबूल स्फोटांमध्ये 90 ठार, 150 जखमी; बायडन म्हणाले…

अमेरीका | काबूल विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांमध्ये 90 लोकांचा मृत्यू झाला असून 150 लोक जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्यानं माध्यमांना दिली आहे.आत्मघाती हल्ल्याद्वारे हा स्फोट करण्यात आल्याचं अमेरिकी सैन्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

यात अमेरिकन लोकांचाही मृत्यू झाल्याचं पेंटागॉनने म्हटलं आहे

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, “या हल्ल्यामागे जे लोक असतील त्यांना शोधून काढू, याची किंमत त्यांना मोजावी लागेल. त्यांना आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही. अमेरिकन लोकांना आमचं काम करण्यापासून दहशतवादी थांबवू शकत नाहीत. आम्ही काबूलमधलं मिशन थांबवणार नाही, लोकांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याचं काम सुरूच राहील.”

तालिबानने या हल्ल्यांचा निषेध केला आहे. आम्ही आमच्या लोकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवून आहोत, असं त्यांनी म्हटलंय. तसंच हे दृष्टचक्र लवकरच थांबेल, असंही तालिबानच्या प्रवक्त्यांनी ट्विट केलं आहे.या स्फोटांमध्ये अमेरिकन नागरिकांचासुद्धा मृत्यू झाल्याचं पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. काबूल एअरपोर्टवर सुरुवातीच्या स्फोटानंतर काही वेळ गोळीबार झाला आणि मग दुसरा छोटा स्फोट झाला, अशी माहिती बीबीसीच्या जॉनाथन बियाल यांनी दिली आहे. दोन्ही स्फोट हे विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच झाले. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील निर्वासित रोज मोठ्या प्रमाणावर गोळा होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंध्रप्रदेशमध्ये स्‍कूल बसचा भीषण अपघात

News Desk

उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब; फेक कॉल करणारा पोलिसांच्या ताब्यात

Aprna

मुलीच्या छेडछाड प्रकरणी तक्रार केल्याने, मुलीच्याच बापावर रॅकेल टाकून जाळले

News Desk