नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांना समाजवादी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. समाजवादीने राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत कपिल सिब्बल यांच्यासह डिंपल यादव आणि जावेद अली खान यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. सिब्बल यांनी १६ मे रोजी काँग्रेसच्या सदस्त्वाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. सिब्बल यांनी आज (२५ मे) समाजवादी पार्टीच्या तिकीटावर राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सिब्बल यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी राज्यसभेचा उमेदवारीचा अर्ज दाखल केला. राजसभेसाठी सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशसाठी आहेत. उत्तर प्रदेशात राज्यसभेसाठी एकूण ११ जागांसाठी निवडणुका होणार आहे. उत्तर प्रदेशात ७ जागा भाजप आणि ४ जागा समाजवादीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Lucknow | I had tendered my resignation from the Congress party on 16th May: Kapil Sibal after filing a nomination for Rajya Sabha elections, with the support of SP pic.twitter.com/yS05HSFWIK
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 25, 2022
याआधी देखील सिब्बल हे उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टीच्या सहकार्याने काँग्रेसचे उमेदवारी म्हणून ते राज्यसभेवर आले होते. यावेळी उत्तर प्रदेशात काँग्रेसचे २ आमदार आहेत. जी २० थ्रीला आक्रमक चेहरा म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी ते समोर आले होते. त्यामुळे पुन्हा काँग्रेसच्या सभेवर सिब्बलांचे राज्यसभेवर जाणे शक्य नाही. यामुळे समाजवादी पार्टीच्या सहकार्याने सिब्बल हे पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिब्बल यांनी पक्ष अध्यक्षांच्या विरोधात वक्तव्य केली होती. त्यामुळे काँग्रेसकडून पुन्हा सिब्बल यांना संधी देईल का?, यावर मोठे प्रश्न उपस्थित आहे. यानंतर आता समाजावादी पार्टीकडून सिब्बल यांना राज्यसभेवर पाठवण्याचे ठरविले आहे.
सिब्बल यांनी समाजवादी पार्टीच्या काही महत्वाच्या केसमध्ये त्यांच्या वकिलींची मदत झाली होती. सिब्बल यांनी नेता आझम खान यांना जामीन मिळवण्यात त्यांचा मोठा हात असल्याचे बोले जाते. तसेच २०१७ मध्ये समाजवादी पार्टीचे चिन्हे अडचणीत आले होते. तेव्हा पार्टीचे चिन्ह कायम ठेवण्यामध्ये सिब्बल यांची कायदेशीर मदत केली होती. यावेळी मदतीची परत फेड म्हणून समाजवादी पार्टी सिब्बल यांना राज्यसभेवर पाठवणार आहे.
#WATCH | Kapil Sibal filed nomination for Rajya Sabha elections, with the support of SP, in presence of party chief Akhilesh Yadav & party MP Ram Gopal Yadav
He says, “I’ve filed nomination as Independent candidate. I have always wanted to be an independent voice in the country” pic.twitter.com/HLMVXYccHR
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 25, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.