बंगळुरु | “आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत,” असे वादग्रस्त वक्तव्य ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रवक्ता वारीस पठाण यांनी केले आहे. हे प्रकरण ताजे असताना बंगळुरुमध्ये काल (२० फेब्रुवारी) सीएएविरोधात रॅलीत एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या मंचावरुन एका तरुणीने माईकवरुन ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी मंचावर उपस्थितांना सर्वांच धक्का बसला आहे. यानंतर ओवेसींनी स्वत: पुढे सरसावत त्या तरुणींच्या हातातून माईक घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुणींनी ‘हिंदुस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
Karnataka: Amulya (who raised 'Pakistan zindabad' slogan at an anti-CAA rally in Bengaluru, yesterday) & was charged with sedition, sent to 14-day judicial custody pic.twitter.com/vWS55tDZEQ
— ANI (@ANI) February 21, 2020
दरम्यान, पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा देणाऱ्या तरुणीचे नाव अमूल्या लियोना असे आहे. तरुणीच्या पाकिस्तान झिंदाबादच्या प्रकरणानंतर आयोजकांनी अमूल्या लियोनाला तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. यानंतर आज (२१ फेब्रुवारी) तिला बंगळुरूच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Asadduduin Owaisi, AIMIM, in Bengaluru: I condemn this statement. The woman is not associated with us. Humare liye Bharat Zindabad tha, zindabad rahega. pic.twitter.com/DMe4Zvsc9L
— ANI (@ANI) February 20, 2020
या प्रकरणावर बोलताना ओवेसींनी प्रतिक्रिया दिली की, ‘शत्रू देशाच्या पक्षात दिल्या जाणाऱ्या घोषणांचे समर्थन केले जाऊ शकत नाही. आम्ही याची निंदा करतो. घडले ते चुकीचेच होते’ असं म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी वेळीच परिस्थिती सावरली. दरम्यान, अमूल्याच्या वडिलांनीही आपल्या मुलीचे कृत्य चुकीचेच होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.