बंगळुरु । प्रसिद्ध ‘कॅफे कॉफी डे’चे मालक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांचा आज (३१ जुलै) पहाटे त्यांचा मृतदेह सापडला आहे. जवळपास ३६ तासांनंतर मंगळुरु येथील नेत्रावती नदीत सिद्धार्थ यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. काही वेळात सिद्धार्थ यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.
Mangaluru Police Commissioner Sandeep Patil: We found the body early morning today. It needs to be identified, we have already informed the family members. We are shifting the body to Wenlock Hospital. We will continue further investigation. #Karnataka pic.twitter.com/bViP94Mpit
— ANI (@ANI) July 31, 2019
सिद्धार्थ सोमवारी (२९ जुलै) कारने सक्लेश्पूर प्रवास करत होते. परंतु, अचानक त्यांनी आपल्या ड्रायव्हरला मंगळुरूकडे वळण्याचे सांगितले आणि तेथील नेत्रावती नदीच्या परिसरात गेले. तसेच ड्रायव्हरने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फोन बंद आला. त्यामुळे ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरी फोन करून ते बेपत्ता असल्याची माहिती दिली. यानंतर त्यानंतर ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांना हे सर्व स्तरातून ते बेपत्ता झाल्याचे सांगितले आणि आज त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
सिद्धार्थ सोमवारपासून (२९ जुलै) बेपत्ता होते. पोलीस त्यांचा गेल्या २४ तासांपासून शोध घेत होते. काल (३० जुलै) पोलिसांनी नेत्रावती नदीजवळील परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यासाठी जवळपास २०० हून अधिक पोलीस, शोधपथक आणि २५ बोटींची मदत घेण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.