बंगळुरू | कर्नाटकात गेल्या १५ दिवसांपासून राजकीय नाट्य सुरू आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींना आज (१९ जुलै) दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे निर्देश राज्यपाल वजुभाई वाला यांनी दिले होते. राज्यपालांनी दिलेली मुदत संपली असून विधानसभेतील कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित केले होते. यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी ६ वाजेपर्यंतची मुदत देऊन मुख्यमत्र्यांना दुसरी संधी दिली आहे.
Karnataka Governor Vajubhai Vala sends letter to Chief Minister HD Kumaraswamy to prove majority before 6 pm, today. #Karnataka pic.twitter.com/ucjypTE8iy
— ANI (@ANI) July 19, 2019
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पत्र लिहून दुसरी संधी दिली आहे. यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. जेडीएसचे आमदार श्रीनिवास गौडा यांनी विधानसभेत भाजपाने ५ कोटींची ऑफर दिल्याचे म्हटले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात विशेषाधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल येणार असल्याचे भाजपाचे नेते येडीयुराप्पा यांनी म्हटले आहे.
BS Yeddyurappa,BJP: Kolar MLA Srinivas Gowda(JDS) alleged in the assembly that he was offered Rs 5 crore by BJP. We are moving a breach of privilege motion against him. #Karnataka pic.twitter.com/vuaVLMzmCS
— ANI (@ANI) July 19, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.