नवी दिल्ली | कर्नाटकातील हाईवोल्टेज ड्रामाचा दुसरा अंकाला सुरुवात झाली आहे. राजीनामा दिलेल्या आमदरांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याचा स्वीकार केला जात नाही. हे एकप्रकारे लोकशाही अधिकारांची पायमल्ली असल्याचे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. न्यायायलायत उद्या (११ जुलै) सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे सर्व बंडखोर आमदारांनी तत्काळ बंगळूरला परतून राजीनामे मागे घ्यावेत. नाही तर त्यांच्या पक्षांतरबंदी अंतर्गत कारवाई होईल, असा इशारा काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी बंडखोरांना दिला असून तशी रितसर तक्रारही सभापती के. आर. रमेशकुमार यांच्याकडे केली आहे. राजीनामे न स्वीकारता पक्षांतरबंदी कायद्याचा वापर करण्याची मागणीही केली आहे.
#Karnataka rebel Congress and JD(S) leaders who have resigned from Assembly, move Supreme Court accusing the Speaker of abandoning his constitutional duty and deliberately delaying acceptance of their resignations. Supreme Court to hear the matter tomorrow. pic.twitter.com/ef3cgICKYC
— ANI (@ANI) July 10, 2019
कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार, जेडीएस नेते शिवलिंगे गौडा आणि काही अन्य काँग्रेसचे नेते राज्य सरकारवर आलेले संकट परतविण्यासाठी नाराज काँग्रेस आमदारांना भेटायला मुंबईत दाखल झाले आहेत. हे सर्व नेते नाराज आमदार थांबलेल्या रेनेसान्स हॉटेलमध्ये पोहचले आहेत. तसेच या ठिकाणी भाजप नेते आर अशोक आणि माजी विधानसभा अध्यक्ष केजी बोपैया हे देखील मुंबईला पोहचले आहेत. या दरम्यान डीके शिवकुमार यांच्या येण्याने भाजप आणि जेडीएस नेते नारायण गौडा यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या हॉटेलच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.