HW Marathi
देश / विदेश

काश्मीरचा हुर्रियत नेता मीरवाइज उमर फारूक ‘एनआयए’समोर चौकशीसाठी दिल्लीत दाखल

नवी दिल्ली | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पैसे पुरविल्या प्रकरणी (टेरर फंडिंग) आरोपी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मिरवाइज उमर फारूक आज (८ एप्रिल) राष्ट्रीय तपास संस्थेसमोर (एनआयए) चौकशीसाठी हजर होण्यासाठी सकाळी श्रीनगरहून दिल्लीत दाखल झाले आहे.  एनआयएने उमर फारूक यांना तिसरी नोटीस जारी केल्यानंतर ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर होणार आहेत.

यापूर्वी एनआयएने उमर फारुक यांना बजावलेल्या नोटिसीला उत्तर देतना त्यांनी दिल्लीतील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत श्रीनगर येथे चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु उमर फारुक यांची ही मागणी एनआयएने फेटाळून लावली होती. त्यामुळे आज एनआयएच्या चौकशीला समोरे जाण्यासाठी उमर फारुक दिल्लीत दाखल झाले आहे.

टेरर फंडिंगप्रकरणी याआधी ‘एनआयए’ने फुटीरवादी नेता सय्यद अली शाह गिलानी याचा जावई अल्ताफ अहमद शाह, मिरवाइज उमर फारुकचा प्रवक्‍ता शाहिद उल इस्लाम, अय्याज अकबर, फुटीरवादी नेता नईम खान, बशीर भट, राजा मेहराजुद्दीन कलवल आणि झहूर अहमद वटाली यांनी अटक केली होती.

 

Related posts

हृदय हेलावणारी गोष्ट

योगी आदित्यची ताजवर खप्पा मर्जी

News Desk

अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद

अपर्णा गोतपागर