तिरुवनंतपूरम । केरळमधील शबरीमाला येथील अय्यपा मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशावरून निर्माण झालेल्या वाद पुन्हा एकदा पेट घेतला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तमिळनाडूमधील १२ महिला पोहचल्याने अयप्पा भक्तांनी या महिलांना विरोध सुरू केला आहे. परंतु या महिलांनी मंदिरापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे.
Kerala: A group of women devotees gather at Pampa base camp to trek to #SabarimalaTemple. pic.twitter.com/1ZzgNAUv8l
— ANI (@ANI) December 23, 2018
#Kerala: Police at Pampa detains Lord Ayyappa devotees protesting against the entry of women devotees to #SabarimalaTemple. pic.twitter.com/fwmXZcICr4
— ANI (@ANI) December 23, 2018
या तणावाच्या पार्श्वभूमीवर पथनामथिट्टा जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत कलम १४४ नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वार्षिक पुजेमुळे मंदिर परिसरात लाखोंच्या सख्येने भाविक जमा झाले आहेत. तमिळनाडूमधील मनिथी संघटनेच्या ३० महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आव्हान दिले होते.
Selvi, member of the women's devotees group who is currently at Pampa base camp to trek to #SabarimalaTemple: We are here since 3.30 am. Police had said that they will provide us with protection but now they are not providing us protection to trek to the temple. pic.twitter.com/jDk8ORltOO
— ANI (@ANI) December 23, 2018
मंदिरात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. भगवान अयप्पाचे दर्शन होईपर्यंत लढा सुरूच ठेवू अशी ठाम भूमिका या महिलांनी मांडली आहे. कोट्टायम रेल्वे स्थानकावर महिलांचे आगमन झाल्यानंतर तेथेच आंदोलकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तब्बल ४१ दिवसांच्या उपवासानंतर २७ डिसेंबरला शबरीमाला मंदिरात मंडला पुजा होणार आहे.
या आधी मंदिरात प्रवेश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा आणि महिला पत्रकार कवीथा जक्कल या दोन महिला हेल्मेट घालून पोलिसांचे संरक्षण घेऊन त्या मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत गेल्या होत्या. परंतु या दोघींनाही मंदिरात प्रवेश करताच आला नाही. पोलिसांना निषेध करणाऱ्यांना रोखता आले नाही. त्यामुळे त्यांना दोघी निराश होऊन पुन्हा परतल्या. आय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातल्या महिलांना प्रवेश बंदी होती. परंतु सर्वोच्च न्यायालायने २८ सप्टेंबर रोजी शबरीमालामध्ये महिलांना प्रवेश द्यावा हा ऐतिहासिक निर्णय दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर यांचे महिला वर्गांनी स्वगत केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.