HW News Marathi
देश / विदेश

केरळ विमान दुर्घटना कशी घडली ? प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय पाहिले ?

केरळ | काल (७ ऑगस्ट) केरळमध्ये कोझिकोड येथे वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून केरळला येणाऱ्या विमानाचा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की विमानाने २ तुकडे झाले. कोझिकोड विमानतळावर धावपट्टीवर घसरल्यानंतर ३० फुट खोल खाडीत हे विमान कोसळले. एअर इंडिया एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा अपघात झाला तेव्हा या विमानामध्ये (IX-1344) २ पायलट, ४ क्रु मेंबर, १० लहान मुले आणि १७४ प्रवासी, असे एकूण १९० जण या होते.

केरळ विमान दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७० लोकांना वाचवण्यात आले आहे. अपघातातील सर्व जखमींना मल्लपूरम आणि कोझिकोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत पायलट कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या साठे यांनी हे विमान कोसळण्यापासून बचाव करत होते. मात्र, काळाने घात केला आणि ही दुर्दैव घटना घडली. या दुर्घटनेनंतर त्याठिकाणी CISF चे बचाव पथक तातडीने पोहोचले. आणि त्यांनी तात्काळ १५० पॅक्स रिकामे केले.

कॅप्टन दीपक साठे हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ५८व्या तुकडीचे विद्यार्थी होते. त्यानंतर सन १९८१ मध्ये हैदराबादमधील एअर फोर्स अकॅडमीमधून ‘स्वर्ड ऑफ ऑनर’ पटकावत उत्तीर्ण होऊन ते बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली. दरम्यान, त्यांनी मिग-२१ या लढाऊ विमानाचेही उड्डाण केल्याची, अशी माहिती निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी दिली. कॅप्टन साठे यांना बोईंग ७३७-८०० हे विमान चालवण्याचा अनुभव होता. नुकतेच त्यांनी एअरबस ए-३१० हे विमानही उडवले होते.

बचाव अभियानात सहभागी असलेल्या एका व्यक्तिने सांगितलं की, जखमी पायलटला विमानाचं कॉकपिट तोडून बाहेर काढलं. एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मोठा आवाज ऐकून आम्ही विमानतळाकडे पळालो. लहान मुलांसह अनेक लोकं विमानात अडकलेली होती. काही लोकं सीटखाली अडकली होती. हे चित्र भयावह होतं. अनेकाचे हात-पाय तुटले होते. सगळीकडे रक्त दिसून येत होतं, असे सांगितले

केरळमधील एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमान अपघातात मृत्यू पावलेले विमानाचे पायलट कॅप्टन दीपक वसंत साठे यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे. त्यांना ‘स्वर्ड ऑफ ऑनर’ने गौरवण्यात आले आहे.त्यांनी बराच काळ ‘गोल्डन अॅरोज-१७’ स्क्वॉड्रनमध्ये सेवा बजावली आहे. हे तेच स्क्वॉड्रन आहे ज्याच्याकडे नुकत्याच हवाई दलात सामिल झालेल्या ५ राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी फ्रान्सहून भारतात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

केरळ विमान दुर्घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले.”केरळच्या कोझिकोड येथे एअर इंडिया एक्सप्रेसच्या वेदनादायक विमान अपघाताविषयी ऐकून वाईट वाटलं. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली. अपघातग्रस्त प्रवासी, क्रू मेंबर्स आणि त्यांच्या कुटूंबियांसोबत माझी सहानुभुती आहे”, असे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन परिस्थितीची माहिती घेतली. कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्हा आयुक्त आणि आयजी अशोक यादवसह अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे आणि बचावकार्य सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच, पंतप्रधानांनी ट्विट करत या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले.

तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करत या विमान अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली वाहिली. आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना देखील केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…त्यांनी भारताचा चहाही सोडला नाही” मोदींचा टुलकिट खुलाशावर हल्लाबोल

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात

News Desk

दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना

News Desk