HW News Marathi
देश / विदेश

दहशतवाद्यांनी केले काश्मीरमधील पोलिसांच्या नातेवाईकांचे अपहरण

श्रीनगर | दहशतवाद्यांनी काश्मीरच्या विविध भागांतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या ९ नातेवाईकांचे अपहरण केले आहे. या व्यक्तींना त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसापासून पोलीस आणि भारतीय लष्कर यांच्यामध्ये चकमक सुरू आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचे अपहरण करण्यामागे हिजबुल या दहशतवादी संघटनाचा हात असल्याचे भारतीय लष्करला संबंध असल्याचे म्हटले आहे.

दहशतवाद्यांनी २४ तासात एकाचवेळी नऊ नातेवाईकांना अपहरण करण्याची घटना घडली असल्याची सांगितले जात आहे. त्रालमधून बुधवारी पोलिसाच्या मुलाला, गंदेरबलमधून एका जवानाच्या कुटुंबातील सदस्य तर गुरुवारी शोपियां, कुलगाम, अनंतनाग, त्राल आणि अवंतीपोरामधून पोलिसांच्या इतर सात नातेवाईकांचे अपहरण करण्यात आले.

या लोकांचे अपहरण झाले

झुबेर अहमद बट, आरीफ अहमद शंकर, फैजान अहमद मकरू, समर अहमद राठेर, गोहर अहमद मलिक, यासीर अहमद बट, नासीर अहमद, शब्बीर अहमद जरगर, आसीफ अहमद राठेर.

सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला गुरुवारी (३० ऑगस्ट) मनी लाँड्रिंग प्रकरणी एनआयएने अटक केले आहे. सय्यद सलाउद्दीनच्या मुलगा शकील नाव असून त्याला श्रीनगरमधील रामबाग परिसराती त्याच्या घरातून एनआयएने अटक करण्यात आली आहे. याठिकाणाहून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. शकीलने दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०७ आमदारांच्या उपस्थितीत झाली बैठक, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माध्यमांसमोर शक्तिप्रदर्शन

News Desk

…असे समजले बेअर ग्रिल्सला मोदींचे हिंदी

News Desk

भारतीय सेनेच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे !

News Desk