HW News Marathi
देश / विदेश

कुलभूषण जाधव दोषी, कायदेशीर लढाई सुरुच ठेवणार !

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) हेरगिरीच्या कथित आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याने सध्या संपूर्ण भारतात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये यावरून धुसफूस सुरु झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निकालानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून कुलभूषण जाधव हे दोषी असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, या प्रकरणी कुलभूषण जाधव हे आपली कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार असल्याचे देखील इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करण्यात आल्याने कुलभूषण यांचे राजनैतिक अधिकार कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचे आदेशही आंतरराष्ट्रीय न्यालयाकडून देण्यात आले आहेत. १५-१ अशा मोठ्या फरकाने हा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी इम्रान खान यांनी ट्विट केले आहे. “कुलभूषण जाधव यांना भारताकडे सोपविण्याबाबत किंवा त्यांची सुटका करण्याबाबतचे कोणतेही आदेश न दिल्याने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुकच आहे. कुलभूषण हे पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध केलेल्या गुन्ह्यात दोषी आहेत. त्यामुळे, पाकिस्तान पुढील कायदेशीर लढाई लढणार आहे”, अशा आशयाचे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधीनी माफी मागावी | रविशंकर प्रसाद

swarit

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील !

News Desk

तीन वर्षाच्या मुलाची दहशतवादी हल्ल्यापासून केली सुटका

News Desk