रांची | चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज रांचीतील सीबीआय न्यायालयासमोर शरण आले आहे. यानंतर न्यायालयाने लालू यांना बिरसा मुंडा तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया तुरुंगात पार पडणार असून लालू यांना रांचीतील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्याची शक्यता आहे.
Jharkhand: RJD Chief Lalu Prasad Yadav reaches CBI Court. He had been ordered to surrender today by Ranchi High Court. #FodderScam pic.twitter.com/v2XbU9BBC5
— ANI (@ANI) August 30, 2018
आधी लालू यांनी झारखंड उच्च न्यायालयात जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी याचिका केली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. न्यायालयाने ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याची सूचना करण्यात आली हीत. यानंतर लालू प्रसाद यादव आज (३० ऑगस्ट)ला शरण आले. न्यायालायाला शरण जाण्याआधी लालू यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहात झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची भेट घेतली. याभेटीनंतर लालू सीबीआयच्या न्यायालयासमोर शरण गेले.
Jharkhand Vikas Morcha chief Babu Lal Marandi met Lalu Prasad Yadav in Ranchi. Yadav has been ordered to surrender today by HC in connection with fodder scam pic.twitter.com/b0l9ihuwLN
— ANI (@ANI) August 30, 2018
काय आहे चारा घोटाळा
बिहार आणि झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपयेचा हा चारा घोटाळा आहे. त्यावेळी लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिले देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरू आहेत. चाईंबासा खटल्यात लालू प्रसाद यादव यांना २०१३ साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु ते जामिनावर बाहेर होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.