HW News Marathi
देश / विदेश

विमानात पेटला लॅपटॉप

बेंगळुरूः विमान प्रवासादरम्यान मोबाईल पेटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता लॅपटॉपला धावत्या विमानात आग लागल्याचा प्रकार थिरुवअनंतपुरम-बेंगळूरु दरम्यान घडला. जळण्याचा वास येत असल्याची प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने आगप्रतिबंधक यंत्रणा सुरू केल्याने दुर्घटना टळली.

गो इंडिगोचे ६ई-४४५ हे विमान थिरुवअनंतपुरमहून बेंगळूरुला निघाले होते. या वेळी काळ्या रंगाच्या छोटय़ा बॅगमधून धूर येत असल्याचे एका प्रवाशाच्या निदर्शनास आले. त्याने लागलीच हवाई सुंदरीच्या ही बाब निदर्शनास आणली. तिने बॅग उघडली तेव्हा लॅपटॉपमधून धूर येत असल्याचे दिसले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अकोल्याचे पाच जण गोवा बीचवर बुडाले

News Desk

छत्तीसगडमध्ये चकमक, १० नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

नवीन संसद भवनाच्या बांधकामाला सुप्रीम कोर्टाने दिली स्थगिती   

News Desk