HW News Marathi
देश / विदेश

एका स्वरयात्रेचा अंत! गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई। भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला.  लता मंगेशकर यांनी आज (६ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजून १२ मिनिटाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या महिनाभरापूर्वी लता मंगेशकरांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण आणि न्यूमोनियाने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालय दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यापूर्वी त्या कोरोनामुक्त झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यानंतर लता मंगेशकरांची तब्यात काल (५ फेब्रुवारी) चिंताजनक झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

लता मंगेशकर यांना मुंबईतील पेडर रोड येथील प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी आज दुपारी १२.३० त्यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्यावर आज सायंकाळी सहा वाजता शिवसाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या पश्चात तीन भगिनी प्रख्यात गायिका आशा भोसले, संगीतकार मीना खडीकर, गायिका उषा मंगेशकर, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आहेत.

लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकर यांना हिंदी सिनेसृष्टी ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. लता मंगेशकर यांना २००१मध्ये भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

लता मंगशेकर यांची तब्यात चिंताजनक असल्याचे कळताच  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रद्धा कपूर, पियुष गोयल यांनीही रुग्णालयात भेट दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१०% आरक्षणच हवं होतं तर मग मोर्चे आणि बलिदान का दिलं ?”, संभाजीराजेंचा सवाल

News Desk

पाकिस्तानातून निघालेली समझौता एक्स्प्रेस आज अटारीत दाखल

News Desk

नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात ‘सरेंडर मोदी’ | राहुल गांधी

News Desk