HW Marathi
देश / विदेश

जाणून घ्या…लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय ?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित करत भारताने अंतराळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती दिली आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. यापूर्वी अंतरिक्ष महाशक्ती असलेल्या राष्ट्रांच्या यादी अमेरिका, रशिया आणि चीनचा समावेश होता. आता चौथ्या स्थानी भारताने आपला तिरंगा फडकविला आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील ‘लो अर्थ ऑरबिट’मधील लाइव्ह सॅटेलाईट पाडण्यात यश आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. भारताकडून ए-सॅट (अँटी सॅटेलाईट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. दरम्यान, लो अर्थ सॅटेलाईट म्हणजे नेमके काय ? जाणून घ्या :

लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय ?

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १६० किमी ते २००० किमी अंतरापर्यंत कक्षा म्हणजे लो अर्थ ऑर्बिट होय. १६० किमीपासून २००० किमी अंतरापर्यंतच्या या कक्षेतच सर्वाधिक संख्येने उपग्रह आहेत. या कक्षेत नकाशे, खनिजांचे मापन, लोकसंख्या, जंगल, शेती यांचे मापन आणि नियोजन करणाऱ्या उपग्रहांची दाटी आहे. विज्ञानासाठी वापरले जाणारे सर्व उपग्रह देखील याच कक्षेत फिरत असतात.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (आयआरएस) या सीरिजमध्ये असलेले उपग्रह त्याचप्रमाणे यासारखे शेकडो उपग्रह या लो-अर्थ ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. या कक्षांमधील अनेक उपग्रह ध्रुवीय कक्षेत म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अशा कक्षेत फिरत असतात. हे उपग्रह सतत सूर्याकडे ‘तोंड’ करून असतात, जेणेकरून त्यांना सौरऊर्जेचा वापर करता येतो. उपग्रहाला जोडलेल्या सौरपट्टय़ांचा सौरऊर्जेसाठी वापर करून उपग्रहातील उपकरणांना वीज पुरवतात.

Related posts

यंदाच्या स्वातंत्र दिनी या राजकीय नेत्यांनी केले ध्वजारोहण

अपर्णा गोतपागर

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्णन यांच्या अटकेचे सर्वोच न्यायालयाचे आदेश 

News Desk

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर गिरीश कर्नाड रडावर

News Desk