HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या…का साजरा केला जातो मानवाधिकार दिवस

मुंबई | माणूस म्हणून जगण्याचा मुलभूत अधिकार म्हणजे मानवी ह्क्क होय. समाजातील प्रत्येक नागरिकाला आपल्या मनाप्राणे जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्या दृष्टीने नागरिकांच्या हक्काचे रक्षण व्हावे या हेतूने दरवर्षी १० डिसेंबरला देशासह संपूर्ण जगभरात मनवाधिकार दिवस साजरा केला जातो. जगभरातील लोकांना त्यांच्या अधिकारांची ओळख करुन देण्यासाठी आणि त्या हक्कांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र, आपल्याला माहितीच नसते की आपले हक्क कोणते आहेत आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणते आहेत मानवी हक्क.

काय आहे मानवाधिकार दिवसाचा इतिहास ?

१) भारतात २८ सप्टेंबर १९९३ पासून मानवाधिकार कायदा लागू करण्यात आला.

२) १२ ऑक्टोबर १९९३ रोजी सरकारने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे गठन करण्यात आले.

३) १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने राष्ट्रीय मानवाधिकार दिवसाची घोषणा केली होती. जगभरातील लोकांना मानवाधिकाराबद्दल जागृत करणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता.

जगभरात मानवतेच्या विरुध्द होणाऱ्या घटना रोखण्यासाठी त्याविरुध्द आवाज उठवण्यासाठी मानवाधिकाराचे खूप जास्त महत्व आहे.

काय आहेत मानवी हक्क ?

१) जीवनाधिकार (Right to life)

प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे.

२) यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कुणालाही यातना देने, अत्याचार करण्यावर प्रतिबंध आहे. प्रत्येक व्यक्ती यातना सहन न करण्यासाठी स्वतंत्र आहे.

३) गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)

गुलामगिरी आणि दास प्रथेवर कायद्याने बंधने आहेत. मात्र जगातल्या अजूनही काही भागात अवैधरित्या दासप्रथेच पालन केले जाते.

४) कोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)

प्रत्येकाला न्यायालयाकडून निष्पक्ष सुनावणीचा अधिकार आहे. ज्यामध्ये योग्य वेळेत सुनावणी, जनसुणावणी, आणि वकीलाची व्यवस्था इत्यादी अधिकार दिले आहे.

५) भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)

प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचे आपल्या विचारांचे आदान प्रदान करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

६) वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य (Freedom of thought, conscience and religion)

प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे. आपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य, आणि कुठल्याही वेळी तो धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे. मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मुलभूत हक्क आहेत. हे हक्क जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात.

या हक्काचे उल्लंघन झाल्यास या ठिकाणी तक्रार करु शकता

१) मानवी हक्कांचे हनन केल्यास त्याची तक्रार पीडित व्यक्ती स्वत: तिचे नातेवाईक वा सामाजिक संस्था राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोगाकडे लेखी वा तोंडी करु शकतात.

२) राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोग स्वत:देखील मानवाधिकार हननाची दखल घेऊन कारवाई करु शकतात.

३) अशा तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्यांतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे काम आयोग करीत असते.

४) आयोगाकडे साध्या पोस्टकार्डावर देखील तक्रार करता येते.

५) तसेच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीचे सल्ले व उपाययोजना शासनास सुचविण्याचे काम पण आयोग करीत असते.

६) महाराष्ट्रात मुंबई येथे राज्य मानवी हक्क आयोगाचे कार्यालय आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन

News Desk

ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवा !

News Desk

मोदी सरकारच्या कार्यकाळात जातीय हिंसाचारात मोठी वाढ

News Desk