HW News Marathi
देश / विदेश

लष्कराची नोकरी सोडण्यासाठी चंदू चव्हाणांचे वरिष्ठांना पत्र

नवी दिल्ली : भारताची सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेला धुळ्यातील जवान चंदू चव्हाण यांनी वरिष्ठांना पत्र लिहून नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती सांगितले. चंदू चव्हाण यांच्यावर सध्या मिलिट्री हॉस्पिटलच्या मनोचिकित्सा वॉर्डात उपचार सुरु आहेत.

भारताने पाकिस्तान विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरु असताना. जवान चंदू चव्हाण २९ सप्टेंबर २०१६ रोजी चुकून एलओसी पार करुन पाकमध्ये गेले होते. त्यानंतर चार महिने चंदू पाकच्या कैदेत राहिल्यानंतर लष्करांने त्यांची सुटका केली. भारतात आल्यानंतर चंदू चव्हाण यांना न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागला, शिवाय वरिष्ठांच्या परवानगीशिवाय शस्त्र घेऊन कॅम्प सोडल्यामुळे त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांना अहमदनगरच्या लष्कर प्रशिक्षण केंद्रावर पाठवण्यात आले. चंदू यांना जवळपास तीन आठवड्यांपूर्वी मिलिट्री हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्यांना मनोचिकित्सा वॉर्डात ठेवले, जेणेकरुन त्यांची देखरेख करता येईल.

”मी गेल्या २० दिवसांपासून मिलिट्री हॉस्पिटलच्या मनोचिकित्सा वॉर्डमध्ये आहे. तीन दिवसांपूर्वी वरिष्ठांना पत्र लिहून नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझ्यासोबत जे झालेय, त्याच्यानंतर माझ्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आता सर्वसामान्यांचे जीवन जगण्याची इच्छा आहे,” असे चंदू चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“गडकरींसारखा एखादा नेता शिवसेनेतही हवा होता”, बाळासाहेब ठाकरेंना गडकरींची भूरळ का पडली?

News Desk

अमेरिकेप्रमाणे भारताने देखील एअर स्ट्राईकचे पुरावे जगापुढे ठेवावेत !

News Desk

मराठा आरक्षणाबाबत वेळकाढू धोरण नको ! संभाजीराजेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk
देश / विदेश

आंध्र प्रदेश एक्सप्रेसला आग, चार डब्यांना लागली भीषण आग

News Desk

ग्वाल्हेर | दिल्लीमधून निघालेल्या आंध्र प्रदेश एक्सप्रेसला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. ट्रेन दिल्लीहून विशाखापट्टणमला जात असल्याची माहिती समोर आली आहे. ग्वाल्हेरजवळ बिर्लानगर येथे हि गाडी पोहचली असताना या गाडीच्या एका डब्याला आग लागली. ही आग हळूहळू पसरत चार डब्यांपर्यंत पोहोचली.

सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्नी शमन दलाकडून सुरू आहेत.

Related posts

‘सीएए’, ‘एनआरसी’विरोधात काँग्रेस आणि अर्बन नक्षल अफवा पसरवत आहेत !

News Desk

आता ड्राईव्हिंग लायसन्सलाही लागणार “आधार”

News Desk

मोदींच्या वाढदिवसापूर्वी कॉँग्रेसने वाटले ‘अच्छे दिन’चे लाडू

News Desk