HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारची नवीन आखणी, 50 कोटी लोकांना होणार फायदा

छत्तीसगड| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी छत्तीसगडच्या विजापूर जिल्हयात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले. ज्याची घोषणा या वर्षीच्या केंद्रीय बजेटमध्ये अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी केली होती. अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्यसेवा उत्तम मिळाव्यात हा योजनेचा मुख्य हेतू आहे.

पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेचा पहिला टप्पा सुरु करताना म्हणाले, या योजनेचा लाभ गरीब, आदिवासी, महिला ज्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत यांना व्हावा यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे देशातील प्रत्येक मोठ्या ग्रामपंचायत मध्ये जवळपास दिड लाख जागेवर सब सेंटर आणि प्रायमरी हेल्थ सेंटर्स ला हेल्थ व वेलनेस सेंटरच्या रुपात सुरु करण्यात येणार आहेत.

या योजनेत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी उपचारासाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा कवच देण्यात येण्याची तरतूद आहे. त्यामुळे देशातील १० करोड कुटुंब म्हणजे जवळपास ५० करोड पेक्षा अधिक लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

 

Related posts

रशिया करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

News Desk

नव निर्वाचित खासदारांकडे या कमिटीची जबाबदारी

News Desk

भारताकडे पाहून अनेक विकसनशील देशही प्रभावित झाले आहेत !

swarit