HW Marathi
देश / विदेश राजकारण

अमेरिकेप्रमाणे भारताने देखील एअर स्ट्राईकचे पुरावे जगापुढे ठेवावेत !

नवी दिल्ली | “ज्या प्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्या कारवाईचे सबळ पुरावे संपूर्ण जगापुढे ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या भारतीय वायू दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे”, असे विधान राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने भारतीय जवानांवर हल्ला घडवून आणला. त्यानंतर भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त केले.

“भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशदवाद्यांच्या तळावर केलेल्या कारवाईबाबत मी प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, या भारतीय हवाई दलाच्या या कारवाईचे फोटो सॅटेलाईटच्या साहाय्याने मिळणे शक्य आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्या कारवाईचे सबळ पुरावे संपूर्ण जगापुढे ठेवले होते. त्याचप्रमाणे भारताने देखील असे करायला हवे”, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

Related posts

राष्ट्रवादीकडून स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी

Gauri Tilekar

शरद पवार यांची भाजप सरकारवर सडकून टीका

Gauri Tilekar

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

Ramdas Pandewad