HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

कर्नाटकात आजच्या एका दिवसात तब्बल ४५ कोटींची मद्यविक्री

नवी दिल्ली | देशभरात आजपासून (४ मे) विविध राज्यांमध्ये मद्यविक्रीला सुरुवात झाली आहे. मद्यविक्रीला परवानगी मिळाल्यानंतर देशातील मद्यप्रेमींना मोठा दिलासा मिळाला. आज अगदी सकाळपासून देशभरातील दारूच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. गेले जवळपास ४० दिवस पूर्णपणे बंद असलेली मद्यविक्री आज सुरु करण्यात आल्याने दारूच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींची मोठी झुंबड उडाली. दरम्यान, मद्यविक्रीतून देशातील राज्यांच्या महसूल वाढीला मोठा हातभार लागतो. याच उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या एका दिवसात कर्नाटकमध्ये तब्बल ४५ कोटी रूपयांची दारू विकली गेली आहे.
कर्नाटक एक्साईज डिपार्टमेंटकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये आज तब्बल 3.8 लाख लिटर बिअर
आणि 8.5 लाख लिटर इतर दारू विकली गेली आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती उद्या (५ मे) उपलब्ध होईल.

Related posts

विशेष कायदा करा, अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा !

News Desk

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाला स्थगिती

News Desk

मुंबई, पुणे मंडळात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

News Desk