HW News Marathi
देश / विदेश

Live Update : पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान भारतीय सैन्याने पाडले

नवी दिल्ली | पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी काल (२६ फेब्रुवारी) पहाटे ३.३० च्या सुमारास जवळपास १००० किलो बॉम्ब टाकून एअर स्ट्राइक केली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिसाने आज (२७ फेब्रुवारी) पाकिस्ताने भारताविरोधात कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.

या हल्ल्यानंतर काल मध्य रात्रीपासून पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने आतापर्यंत अखनूर, पुंछ, नौशेरा आणि पुंछ सेक्टरमध्ये जोरदार गोळीबाराला सुरुवात केला आहे. भारतीय जवान देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या विमानांनी जम्मू काश्मीरमधील राजौरी भागात बॉम्ब टाकल्याची माहिती मिळते. मात्र, पाकिस्तानच्या विमानाला भारतीय हवाईल दलाने चोख प्रत्युत्तर देत केल्याने माघार परतल्याचे समजते.

Live Update :

“एकदा युद्ध झाले तर माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या हातात नियंत्रण राहणार नसल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

दहशतवादाविरोधात आम्ही संवाद साधण्यासाठी तयार असल्याचे इम्रान म्हणाले आहे. “इतिहास साक्ष आहे की, जेव्हा युद्ध होते ते कधी कधी संपते हे सांगता येत नाही.”

पाकिस्तानने भारतीय सरकार अधिकृरित्या वायुसेनेतील एक पायलट सापडल्याची माहिती देण्यात आलेली नसल्याची माहिती एएनआयने केला आहे.

भारतीय हवाई दलाचे मिग-२१ विमान परतले नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांची पत्रकार परिषदेत दिली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्र्यालयाची बैठक दुपारी ३.१५ सुरु होणार आहे.

भारतीय वायु सेनेचा एक पायलट हरविला आहे. आयएएफ विंग कमांडर अभिनंदन असे त्याचे नाव आहे. भारताचे मिग-२१ परतले नसल्याची माहिती नाही.

 

दिल्लीत सर्व पक्षीय बैठकीला सुरुवात

सर्व देशांनी एकत्र येवून दहशतवादी विरोधात आवाज उठविला पाहिजे, असे या बैठकीत म्हटले आहे.

सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या १६ परराष्ट्र मंत्र्यांच्या संयुक्त परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारत, रशिया आणि चीन (आरआयसी) या राष्ट्रांनी सर्व दहशतवाद्यांचा निंदा केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत एक अत्यंत मोठे विधान केले आहे. “जर लादेनला मारले जाऊ शकते तर काहीही शक्य आहे”, असे विधान अरुण जेटली यांनी केले आहे. जर अमेरिका करू शकते तर भारतही करू शकतो”, असेही अरुण जेटली यावेळी म्हणाले आहेत. दिल्लीत आज (२७ फेब्रुवारी) केंद्रीय गृहमंत्रालयाची तातडीची बैठक घेण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह तिन्ही दलाच्या प्रमुख उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली होती. यानंतर आता नवी दिल्लीत बोलताना अरुण जेटली यांनी हे विधान केले आहे.

भारतीय वायु दलाने पाकिस्तानी वायु दलाचे एफ-१६ हे विमान पाडले आहे. परंतु या विमानाशी आमचा काही संबंध नसल्याची माहिती पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली आहे.

भारत-पाकिस्तान देशांमधून जाणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. काही विमाने पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सुरक्षेच्या कारणामुळे उत्तराखंड येथील विमानतळ तुर्तास बंद करण्यात आले आहे.

 

पाकिस्तानाच्या या घटनेनंतर भारताने अमृतसर, श्रीनगर, लेह, पठाणकोट आणि जम्मू या पाच ठिकाणांचे विमानतळे नागरी उड्डाणांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या हवाई हद्दीत खुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय वायू दलाकडून पिटाळून लावण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारतीय वायू दलाने पाकिस्तानी वायू दलाचे एफ-१६ हे विमान पाडल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानने त्यांच्या विमानतळांवरील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक तातडीने बंद केली आहेत. पाकिस्तानमधील लाहोर, मुलतान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद ही विमानतळे तातडीने बंद करण्यात आल्याची माहिती, एएननाय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रघुराम राजन यांना अर्थशास्रातील नोबेल ?

News Desk

“रिझर्व बँकेच्या नोटांवर गांधींच्या फोटोऐवजी मोदींचा फोटो लावतील…”, तेलंगणाच्या मंत्र्यांचा कॉलेजचे नाव बदलल्यावरुन टोला

Aprna

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूने रचला इतिहास….!

News Desk