HW News Marathi
Covid-19

देशात ३१ ऑगस्टपर्यंत ‘अनलॉक ३’, ‘कंटेन्टमेंट झोन’मध्ये पुन्हा नियम कडक

नवी दिल्ली | भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक सातत्याने अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. देशात तब्बल अडीच ते ३ महिन्यांचा लॉकडाऊन पाळल्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, या काळात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे, आता केंद्र सरकारकडून देशातील कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशातील या ‘अनलॉक ३’करिता नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत.

‘अनलॉक ३’करिता केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे

  • विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियम पाळत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांना परवानगी.
  • शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस ३१ ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय
  • ५ ऑगस्टपासून योगा इन्स्टिट्यूट आणि जिम्स सुरु करण्यास परवानगी.
  • नाइट कर्फ्यू हटवण्याचा केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • कंटेनमेंट झोनसह मेट्रो, स्विमिंग पूल, बार, सिनेमागृहे, चित्रपटगृहे, सभागृह बंदच राहणार
  • कंटेनमेंट झोनसह सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडाविषयक तसेच मनोरंजनविषयक कार्यक्रमांना परवानगी नाही.
  • केंद्राच्या ‘वंदे भारत मिशन अंतर्गत’ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मर्यादित प्रवासाची परवानगी.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३ तारखेनंतर मोकळीक देताना सावध राहण्याची गरज !

News Desk

देशात ५० हजारांच्या पुढे रुग्ण झाले कोरोनामुक्त!

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk