“चंद्रापासून २.१ किलोमीटरवर असेपर्यंत नियोजित मार्गाने विक्रम काम करत होते. मात्र त्यानंतर संपर्क तुटला आहे. विक्रम लँडरशी संपर्काची आम्हीही वाट पाहतोय. सध्या डेटाची तपासणी केली जात आहे. लवकरच माहिती देऊ”, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रो प्रमुख के.शिवन यांची पाठ थोपटली. तसेच इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे तोंडभरुन कौतुक देखील केले. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. तसेच, जीवनात चढउतार येतच असतात, देशाला तुमच्यावर गर्व आहे, असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले आहे. चांगल्या पहाटेची आशा करुया, असेही मोदी म्हणाले.
India is proud of our scientists! They’ve given their best and have always made India proud. These are moments to be courageous, and courageous we will be!
Chairman @isro gave updates on Chandrayaan-2. We remain hopeful and will continue working hard on our space programme.
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2019
रफ ब्रेकींग यशस्वी
Rough breaking of #VikramLander ends and Fine braking phase starts#Chandrayaan2 #ISRO
— ISRO (@isro) September 6, 2019
काय आहे रफ ब्रेकींग प्रक्रिया?
सॉफ्ट लँडिंगच्या दरम्यान लँडर विक्रमचा वेग कमी करण्याचे काम सर्वात आव्हानात्मक असेल. विक्रम लँडर सध्या चंद्रापासून ३० ते ४५ मिनिट किलोमीटरच्या उंचीवर आहे. १.३८ मिनिटला विक्रम चंद्रावर उतरण्याची प्रक्रियेला सुरूवात होईल. सर्वात आधी विक्रमचा वेग १३०० किमीने कमी केला जाईल. त्यानंतर दहा मिनिटांनी विक्रम चंद्रापासून फक्त साडे सात किलोमीटर अंतरावर येईल. एक वाजून ५० मिनिटांनी विक्रमचे कॅमेरे लँडीगसाठी जागा शोधेल. ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विक्रमची दोन इंजिने काम सुरू करतील. वेग कमी करत विक्रम आणखी चंद्राच्या जवळ पोहचेल. ज्यावेळी विक्रम चंद्रापासून दहा मीटर उंचीवर असेल तेव्हा यानाचं सेंटॅल इंजिन सुरू होईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.