मुंबई |द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या जवळ समर्थकांची गर्दी वाढली असल्यामुळे रुग्णालयाबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रात्री 9.15 च्या सुमारास कावेरी रुग्णालयात एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार करुणानीधी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. करुणानिधी यांची प्रकृती नाजूक असली तरी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं कावेरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जाहीर केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितले आहे.
एम. करुणानिधीचे सर्व कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. करुणानिधी यांना मूत्रमार्गाच्या भागात संसर्ग झाल्यामुळे चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. रविवारी अनेक नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन करुणानिधी यांची भेट घेतली. नेत्यांनी भेट दिल्यानंतर करुणानिधी यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने हॉस्पिटल बाहेर गर्दी केली आहे. करुणानिधी यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कावेरी हॉस्पिटलबाहेरील करुणानिधी यांच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केला लाठीचार्ज
#WATCH: Outside visuals of Chennai's Kauvery hospital, where DMK Chief M Karunanidhi is admitted. Police lathi charge crowd gathered outside. #TamilNadu pic.twitter.com/3fkR0LFlb1
— ANI (@ANI) July 29, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.