चेन्नई | डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कावेरी रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.रविवारी रात्री एम. करुणानिधी यांच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले होते, एम. करुणानिधी यांची प्रकृती नाजूक असली तरी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांच्या प्रकृतीची काळजी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेत आहे.
For past 3 days we've been waiting here. We didn't have food or water. We don't know what's happening to our Thaliavar. Will somebody tell us? What's the harm in giving us details? We're his supporters&want to know: DMK supporters outside Chennai's Kauvery hospital #Karunanidhi pic.twitter.com/pkymefKOmf
— ANI (@ANI) July 29, 2018
करुणानिधी यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात येऊन एम. करुणानिधी यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली.
DMK chief M Karunanidhi responding to treatment, says son MK Stalin; urges cadre to not indulge in violence
Read @ANI Story | https://t.co/N66PjfSyQR pic.twitter.com/Nz7hx0r8zt
— ANI Digital (@ani_digital) July 29, 2018
दरम्यान, एम. करुणानिधी यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयाच्या आवारात रविवारी रात्री गर्दी केली होती. यावेळी त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तसेच करुणानिधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.