भोपाळ | देशात कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये शिवराजसिंह चौहान सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (२१ एप्रिल) झाला आहे. यात भाजपच्या ५ नव्या मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. चौहान यांच्या मंत्रिमंडळात नरोत्तम मिश्रा, तुलसी सिलावट, कमल पटेल, गोविंदसिंह राजपूत आणि मीना सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल लालजी टंडन यांनी मंत्र्यांना शपथ दिली. लॉकडाऊन हटल्यानंतर पुढील महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. दिल्लीवरून सोमवारी (२० एपिल) संमती मिळाली.
Madhya Pradesh: BJP leaders Narottam Mishra, Kamal Patel, Meena Singh, Tulsi Silawat and Govind Singh Rajput took oath as ministers, at the state cabinet expansion ceremony in Bhopal today. pic.twitter.com/RBEJk449Bk
— ANI (@ANI) April 21, 2020
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक म्हणून ओळखले जाणारे तुलसी सिलावट मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी तुलसी सिलावट यांना राज्याचे अर्थमंत्री देण्यात आल्याच्या चर्चा सध्या मध्य प्रदेशाच्या राजकारणात रंगल्या आहेत. पक्षात बंडखोर म्हणून प्रसिद्ध असलेले कमल पटेल हे माजी मंत्री आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदेंच्या जोरावर मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार शिवराजसिंग चौहान यांनी पडली. आणि २३ मार्च रोजी शिवराजसिंग चौहान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर गेला होता. अखेर आज शिवराजसिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.