HW News Marathi
देश / विदेश

ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेस अध्यक्ष करा, मध्ये प्रदेशमध्ये बॅनरबाजी

भोपाळ | काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी उत्तर प्रदेशाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. यानंतर मध्य प्रदेशात ज्योतिरादित्यांना काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळायला द्यावी, असे आवाहन करणारे बॅनर लावून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे.

निवडणुकीतील पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन ज्योतिरादित्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत म्हटले की, ‘लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य करून त्याची जबाबदारी मी स्वीकारत असून, मी माझ्याकडे असलेल्या पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करत आहे. माझ्याकडे हा पदभार सोपवून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,’ असे शिंदे यांनी राजीनामा देताना सांगितले.

मध्य प्रदेशमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करण्यात ज्योतिरादित्य यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधानसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर त्यांना मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांना प्रबळ दावेदार मानले जात होते. यानंतर पक्षाकडून ज्योतिरादित्य यांना लोकसभा निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनी लाँड्रिंग ॲक्टच्या घटनात्मक वैधते विरोधात रॉबर्ट वाड्राची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

swarit

ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना क्षमता सिद्ध करण्यासाठी मिळाला दिलासा

News Desk

भारताकडून इतर देशांना स्वस्त दरात पेट्रोल विक्री

News Desk