HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकातील राजीनामा दिलेले आमदार मुंबईच्या हॉटेलमध्ये

मुंबई | कर्नाटकातील जनता दल सेक्युलर (जेडीएस) आणि काँग्रेस आघाडीचे सरकारला शनिवारी (७ जुलै) मोठा फटका बसला आहे. यात सत्ताधारी काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामुळे कर्नाटकात कुमारस्वामीची सरकार धोक्यात आहेत. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांच्या संख्येत सातत्याने घट झाली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा असून सत्ता स्थापन करण्यासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे.

कर्नाटकात शनिवारी राजीनामा देण्या आमदारांपैकी १० आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. आतापर्यंत काँग्रेस आणि जेडीएस मिळून १३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तसेच राज्यापालांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. १३ आमदार राजीनामा सोपवण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांकडे गेले होते. मात्र अध्यक्षांची भेट न झाल्याने त्यांनी त्यांच्या सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला.

गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकात काँग्रेसच्या १३ आणि जेडीएसच्या ३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. आता कर्नाटकात सत्ताधाऱ्यांकडे १०५ संख्याबळ आहे. तर दुसऱ्या बाजुला भारतीय जनता पक्षाकडे १०५ आमदार आहेत. तसेच एका अपक्षाच्या पाठिंबादेखील आहे. त्यामुळे १०६ आमदारांच्या संख्याबळावर भाजप कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसाराम बापूला जामीन मिळणार का ?

News Desk

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ वर ! देशात सर्वाधिक कोरोनारूग्ण महाराष्ट्रात

Arati More

भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (ईसीटीए) स्वाक्षरी

News Desk