HW News Marathi
देश / विदेश

लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारात महाराष्ट्र व मध्यप्रदेश दुस-या क्रमांकावर  

मुंबई | कश्मीरमध्ये आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना देशाच्या इतर भागात देखील लहान मुलांची सुरक्षा अधांतरी असल्याचे क्राय( चाइल्ड राइट्स अँड यू ) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे आशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले आहे.

या संदर्भात क्रायने केलेल्या सर्वेक्षणात गेल्या दहा वर्षांत लहान मुलांवरील अत्याचारांत ५०० टक्क्यांपेक्षा जास्त लक्षणीयवाढ झाली आहे. यात (२००६ मधील १८,९६७ वरून २०१६ मध्ये १,०६,९५८ पर्यंत)झाली आहे. त्याचबरोबर या दहा वर्षांच्या कालावधीतील शेवटच्या चार वर्षांत (२०१२ ते २०१६) त्या आधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत (२००६ ते २०११) मध्ये जास्त वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषणशाखेच्या (एनसीआरबी) माहितीनुसार भारतातील लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारात २०१५ ते २०१६ दरम्यान १४ टक्के वाढ झाली आहे. २०१६ मध्ये क्राइम्स अंडर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोस्को) कायद्यानुसार एकूण गुन्हेगारीमध्ये लहानमुलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण एक तृतीयांश आहे. भारतात दर पंधरा मिनिटांना एक लहान मुलावर लैंगिक अत्याचार होतात. ही बाब निश्चितच धोकादायक आहे.

लैंगिक गुन्ह्याचे स्वरूप आणि प्रकार पाहाता दाखल करण्यात आलेल्या केसेसच्या संख्येनुसार लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांवर होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण १८ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर अपहरण आणि खंडणी पहिल्या क्रमांकावर आहे. २०१६मध्ये नोंदवल्यानुसार त्याचे एकूण गुन्ह्यांतील प्रमाण निम्मे (५४७२३गुन्ह्यांपैकी ५१.१ टक्के) आहे. पोस्को कायद्या अंतर्गत एकूण गुन्ह्यांपैकी अंदाजे ३३ टक्के गुन्हे लहान मुलांशी संबंधित असतात. गेल्या पाच वर्षांत लहान मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचांराच्या नोंदणीचे प्रमाण ३०० टक्क्यांनी वाढले असून ही बाब थक्का करणारी आहे. अशा प्रकारच्या नोंदवल्या गेलेल्या घटना लक्षात घेतल्यास मुलांवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त अत्याचार उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उडीशा या केवळ पाच राज्यांत घडतात. लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये १५ टक्क्यांसह उत्तर प्रदेशआघाडीवर आहे, तर महाराष्ट्र व मध्य प्रदेश अनुक्रमे १४ व १३टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील३६ राज्यांपैकी ११ राज्यांत ५० ट्क्कयांपेक्षा जास्त लहान मुलांवर जास्तलैंगिक अत्याचार होत असून ३६ राज्यांपैकी २५ राज्यांमध्ये घडणाऱ्या एकूण गुन्ह्यांत लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचेप्रमाण एक तृतीयांश आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या सत्तांतरावर शिंदे गटाच्या वकिलांनी ‘या’ केसचा दिला हवाला

Aprna

पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा जास्त असणे म्हणजे जनतेचे शोषण | सुब्रमण्यम स्वामी

News Desk

मोठ्या शहरातील महामार्गावर चालवता येणार वाइनशॉप, बिअरबार

News Desk