HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री अमित शाहांची भेट घेणार

मुंबई | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर (Maharashtra-Karnataka border dispute) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चितावणीखोर वक्तव्य केली जात आहे. तर बेळगावमध्ये 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदीके संघटनेने दगडफेक करत हल्ला केला होता. यानंतर दोन्ही राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तणावाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीव अमित शाहांनी आज (14 डिसेंबर) दिल्लीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

यापूर्वी महाविकास आघाडीच्या खासदारांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून 9 डिसेंबर रोजी अमित शाहांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीच्या खासदारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची तक्रार अमित शाहांकडे केली होती. यानंतर अमित शाहांनी आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेऊन महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर चर्चा करणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचले होते. बोम्मईने ट्वीट करत म्हटले, “महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही.”

 

बसवराज बोम्मई ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राच्या शिष्ठमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. यापूर्वी ही महाराष्ट्राने असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. आणि राज्यातील कायदेशी भूमिका मांडण्यासाठी मील लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहे”, असे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांनी मध्यधी करावी, अशी विनंती त्यांनी केली होती.

संबंधित बातम्या

सीमावादावर ‘मविआ’च्या खासदारांची शाहांसोबत चर्चा; बोम्मईंने ट्वीट करत पुन्हा महाराष्ट्राला डिवचले

 

 

Related posts

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, आयआयटीचे ३५ विद्यार्थ्यांसह ४५ नागरिक बेपत्ता

swarit

Air India : आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे ऑनलाईन बुकिंग सुरु

News Desk

ऑगस्ता वेस्टलँड घोटाळा : ख्रिस्तियन मिशेल भारताच्या ताब्यात

News Desk