HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रातून ‘या’ ४ जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात लागली लॉटरी

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज (७ जुलै) केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोणत्या नेत्यांना केंद्रात जागा मिळाणार याची चर्चा सुरु होती. अखेर काही नावांवर शिक्कामोर्तब झाला आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांच्या नावावर शिक्का लागला आहे. राज्यात सतत शिवसेनेला टिकेच्या धारेवर ठेवणारे नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.

नवीन मंत्रिमंडळात २५ राज्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. संतोष गंगवार, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, रतनलाल कटारिया, थावरचंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी देखील राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी काही मंत्र्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये १३ वकील, ५ अभियंते असू शकतात. मंत्र्यांमध्ये 5 डॉक्टर देखील आहेत. संभाव्य मंत्र्यांमध्ये 4 माजी मुख्यमंत्र्यांची नावेसुद्धा समाविष्ट आहेत. संभाव्य मंत्र्यांमध्ये ५ अभियंते देखील आहेत.

प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंकजांचं ट्विट, म्हणाल्या…

अगदी कालपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशासाठी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आज सकाळपासून हे चित्र पूर्णपणे पालटले आणि पंतप्रधान मोदी यांनी धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील काही अनपेक्षित चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. मात्र, तरीही काहीजण प्रीतम मुंडे या मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्याचा छातीठोक दावा करत होते.

या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करुन हा संभ्रम दूर केला आहे. खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पहिली ती चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे काही राजकीय पडसाद उमटणार का, हे आता पाहावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही !

News Desk

नागरिकांना ६ महिने पुरेल इतका अन्नसाठा देशात आहे

News Desk

अटल बिहारी वाजपेयी पंचतत्त्वात विलीन, मुलगी नमिताने दिला मुखाग्नी

News Desk