HW News Marathi
देश / विदेश

देशभरातील हिरानंदानी समुहाच्या 24 ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

मुंबई | नामांकित बांधकाम व्यावसायिक हिरानंदानी समुहावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयकर विभागाचे अधिकारी आज (२२ मार्च) आज हिरानंदानी समुहाच्या मुंबई, चेन्नई, बेंगळुरू अशा २४ जागांवर आयकर विभागाने छापेमारी सुरू आहे. हिरानंदानी समुहाच्या कार्यालयात आयकर विभागाचे अधिकारी तापस करत आहेत. यापूर्वी हिरानंदानी समुहामध्ये ८ वर्षापूर्वी आयकर विभागाने छापेमारी केली होती.

हिरानंदानी समुहाने चेन्नईतील नवी टाईनशीप आणि बेंगळुरूमधील डेटा सेंटर बांधकाम करताना कर चोरी केल्याच्या संशयावरून आयकर विभागाला आहे. यामुळे आयकर विभागने हिरानंदानी समुहावर कारवाई केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. निरंजन आणि सुरेंद्र हिरानंदानी हो दोन्ही भाऊ रिअल इस्टेट कंपन्या चालवत असून निरंजन हिरानंदानी यांनी हिरानंदानी कम्युनिटीजचे  संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर सुरेंद्र हिरानंदानी हाऊस ऑफ हिरानंदानीचे अध्यक्ष आणि संचालक आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयाला भीषण आग

News Desk

अजित पवार -देवेंद्र फडणवींसाचा वाढदिवस एकत्र असला तरी राजकीय सूर एकत्र का नाहीत ?

News Desk

संभाजीराजे राज्यसभा निवडणूक लढणार की माघार घेणार?, उद्या घेणार पत्रकार परिषद

Aprna