HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्राचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारीत शहीद

जम्मू-कश्मीर | पाकिस्तानने केलेल्या गोळीबारीत महाराष्ट्रातील परभणीमधील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचा २० वर्षीय शिपाई शुभम मुस्तापुरे जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर नेहमीच शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे.

जम्मू-कश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी येथे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून मंगळवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारीत एका ऑफिसरसह तीन जवान जखमी झाले. या गोळीबारीत शुभम मुस्तापूरे याला वीरमरण आले. पाकच्या या गोळीबारीचे भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शुभम यांच्या पश्चात आई सुनिता, वडील सूर्यकांत आणि दोन भाऊ आहेत. २० वर्षीय शुभम शहीद झाल्याचे कळताच कोनेरवाडी गावावर शोककळा पसरली. तसेच पालमच्या तहसीलदार तेजस्विनी जाधव, तलाठी, मंडल अधिकारी यांनी कोनेरवाडी येथे जाऊन शुभम मुस्तापुरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल ! मुंबईसाठी राऊतांची साद

News Desk

१५ कोटी वर्षापूर्वीचे डायनासॉरचे आवशेष सापडले

News Desk

मायावतींचा काँग्रेसला मोठा धक्का, जोगींसोबत एकत्र येण्याचा निर्णय

Gauri Tilekar