HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राचा वरचष्मा..

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार असून यामध्ये महाराष्ट्राचा वरचष्मा राहणार असल्याची सूत्रांची माहीती आहे. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू हे सध्या मंत्रिमंडळात तर आहेत, शिवाय आणखी दोघांना यावेळी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या एका खासदाराचा समावेश आहे तर नव्याने पक्षात रुजू होणाऱ्या कोकणातील एका नेत्याचा समावेश होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. परंतु आगामी काळात कर्नाटक, गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेथील काही खासदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. एकूण आठ ते दहा नव्या मंत्र्यांना शपद दिला जाणार आहे. त्यांची नावे मोदी-शहा जोडीने गुलदस्त्यात ठेवली आहेत. परंतु आज सायंकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

राजीनामे देणारे मंत्री-

मागील दोन दिवसांत आठ मंत्र्यांनी राजीनामे दिले होते,आणखी दोघे राजीनामा देण्याची शक्यता आहे. कलराज मिश्रा, उमा भारती, बंडारू दत्तात्रय, राजीवप्रताप रुडी,फग्गनसिंह कुलस्ते, संजीव बलियां आणि महेंद्रनाथ पांडे यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदीय अधिवेशनाच्या काळात दिल्लीत शरद पवारांसह विरोधकांची ‘चाय पे चर्चा’

News Desk

सुपरस्टार रजनीकांतचा राजकारणाला रामराम!

News Desk

नवाज शरीफ आणि मुलगी मरियमला विमानतळावर अटक

News Desk